चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडने ५७ षटकात २ बाद १४० धावा केल्या आहेत.
इंग्लंडकडून जो रुट आणि डॉम सिब्लीने दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या सत्रात नाबाद फलंदाजी करत इंग्लंडला १४० धावांचा टप्पा पार करुन दिले. तसेच दुसरे सत्र इंग्लंडच्या नावावर केले. या दोघांनी दुसऱ्या सत्राखेर तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांनी नाबाद भागीदारी केली आहे.
या सत्रात भारताकडून जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, शहाबाज नदीम अशा सर्वांनी या दोघांना बाद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
इंग्लंडने दुसरे सत्र संपले तेव्हा पहिल्या डावात ५७ षटकांत २ बाद १४० धावा केल्या आहेत. रुट १०० चेंडूत ४५ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली १८६ चेंडूत ५३ धावांवर नाबाद खेळत आहे.
भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम
इंग्लंडचा संघ –
रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
