Share

PAK vs AUS: जगातील नंबर वन गोलंदाजाला घायाळ करणारा ‘तो’ पाकिस्तानी फलंदाज कोण?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि ऑस्टेलिया यांच्यात आज पासून पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी सलामी फलंदाज अब्दुल्लाह शफीक आणि इमाम उलहक यांनी संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनी १०५ धावांची शतकीय भागीदारी केली.

कांगारू संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या अगोदर त्यांनी १९९८ मध्ये पाकीस्तान दौरा केला होता. रावळपिंडी क्रिकेट स्टेडीयमवर सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानी युवा फलंदाज अब्दुल्लाह शफीक याने जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज पॅट कमिंसचा किफायतशीर सामना केला. कमिंसने त्याला बऱ्याच वेळा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु शफीकने त्याला प्रत्येक वेळी कामयाब होऊन दिले नाही.

या सामन्यात शफीक कमिंसवर भारी पडताना पाहायला मिळाला. यावर काही क्रिकेट तज्ञ म्हणाले की, शफीककडे अवघ्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असतानाही त्याच्यात या सामन्यात खुप आत्मविश्वास पाहायला मिळाला. त्याच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचाही जास्त अनुभव नाही. परंतु तरीही त्याने कमिंस, मिचेल स्‍टार्क, जोश हेजवलुड, नेथन लायन, ट्रेविस हेड सारख्या गोलंदाजांचा सामना केला. शफीकने या सामन्यात ४४ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!