Share

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा बोलबाला, ‘हे’ चार खासदार होणार मंत्री ?

Published On: 

नवी दिल्ली : येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मधल्या काळात दोन केंद्रीय मंत्र्यांचं निधन झालं होतं. शिवाय शिवसेना आणि अकाली दल एनडीएतून बाहेर पडली आहेत. तसेच अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यावर केंद्र सरकारने भर दिल्याचं बोललं जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारत भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर राज्यसभा खासदार डॅा. भागवत कराड, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, रणजित निंबाळकर यांनाही केंद्रात स्थान मिळणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.

भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर इतर कराड, निंबाळकर, आणि कपिल पाटील यांची देखील मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!