🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला. यांनी याबाबत घोषणा केली.
प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘आम्हाला आनंद आहे की देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. आजचा महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.
रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेमा विश्वात राज्य करीत आहेत. आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळेच दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचे निर्णायक मंडळाने निश्चित केले आहे. निर्णायक मंडळामध्ये आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई यांच्या एक मतावर रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कर देण्याचे जाहीर केले आहे.
Popular across generations, a body of work few can boast of, diverse roles and an endearing personality…that’s Shri @rajinikanth Ji for you.
It is a matter of immense joy that Thalaiva has been conferred with the Dadasaheb Phalke Award. Congratulations to him.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करून म्हणाले, लोकप्रिय तसेच, ‘विविध भूमिका आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व राजनीकांतजी…आपल्यासाठी. ‘थलाइवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन.’
महत्वाच्या बातम्या
- आकाश चोप्राने सांगितलं आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीमचं नाव
- ‘व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय फिरवलात; आता अशीच तत्परता पेट्रोल, डिझेलवर लादलेली दरवाढ मागे घेण्यात दाखवा’
- जालन्यात व्यापाऱ्यांसह ग्राहकांवर कारवाई
- ‘फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही’
- आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
