Share

‘महागाईवर नियंत्रण आणण्याचे काम सरकारच्या हातामध्ये’: भारतीय रिझर्व्ह बँक

Published On: 

मुंबई : इंधनाच्या किंमतीने देशात उच्चांक गाठला असून या मुळे महागाईच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे देशात सरकारविरोधी अनेक आंदोलन केले जात आहे. यातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, महागाईवर नियंत्रण आणण्याचे काम आता सरकारच्या हातामध्येच आहे.

कोरोनाचे संकट कमी होत असून अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे, याआधी दिलेले प्रोत्साहनपर पॅकेज कमी करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. इंधनावर सरकारकडून लादण्यात आलेल्या करांचा बोजा मोठा आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ होत आहे. मात्र सरकारने या करांचे प्रमाण कमी केल्यास नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल आणि हे करणे केंद्र व राज्य सरकारच्या हाती असल्याचे शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

अर्थव्यवस्थेमध्ये अधिक रोकड असल्यास चलनाचे मूल्य कमी होत असल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये आरबीआयने २.२ लाख कोटी रुपयांची बॉण्ड खरेदी केली आहे. आगामी काळामध्ये ही खरेदी काही प्रमाणात कमी करणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ९.५ टक्के राहण्याचा अंदाज बँकेने कायम ठेवला आहे. मात्र अन्नधान्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात कपात झाल्यामुळे चलनवाढीचा दर ५.८ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांवर येण्याचा सुधारित अंदाजही वर्तविण्यात आला आहे. सलग आठव्या वेळी बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर कायम ठेवतानाच बँक दरही कायम ठेवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!