Share

महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट सापडली; समोर आली धक्कादायक माहिती

Published On: 

बाघंबरी – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडीदेखील रेकॉर्ड केला होता.दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने देखील या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!