Share

‘रासप NDA तील घटकपक्ष असल्याने मी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलणार नाही’

Published On: 

पुणे – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

सरकारशी सातत्याने अपयशी होणाऱ्या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत. रविवारी सकाळपासूनच शेतकरी दिल्लीच्या सिंघु, टीकरी, दिल्ली गाजियाबाद, चिल्ला आणि इतर सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शनिवारी पुन्हा एकदा सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत.

या आंदोलनाला तसेच कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला तसेच भारत बंदला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे.शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादी,प्रहारसह आम आदमी पक्षाने देखील पाठींबा दिला आहे.

दरम्यान, या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट भूमिका घेण्याचं टाळलं आहे.’राष्ट्रीय समाज पक्ष NDA तील घटकपक्ष असल्याने मी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलणार नाही. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी चांगल्याच योजना आणल्या आहेत,’ असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.न्युज१८ लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!