मुंबई:- राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.
महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेलं अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेलं यश या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. या निवडणुकीमुळे सर्वत्र जानकर चांगलेच चर्चेत आले होते.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- व्यापाऱ्यांवर वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू- अंकुश काकडे
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवारांची भूमिका काळानुरुप बदलते; दरेकारांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

