🕒 1 min read
मुंबई : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
यादरम्यान बुधवारी १४ जुलै रोजी आयसीसीने ट्विट करत डब्ल्युटीसी स्पर्धेच्या नवीन वेळापत्रकाची घोषणा केली. डब्ल्युटीसी स्पर्धेत यापुर्वी असलेल्या स्वरुपानुसार घरच्या मैदानावर तीन मालिका आणि परदेशात तीन मालिका हीच पद्धत कायम ठेवली आहे. मात्र यावेळी पॉईटंस् सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. एखादा संघाने जर सामन्यात विजय मिळवला तर १२ गुण मीळतील, जर सामना टाय झाला तर ६ गुण मिळतील आणि जर अनिर्णीत राहिला तर ४ गुण पण सामना गमावला तर मात्र एकही गुण मिळणार नाही.
???? 12 points available every match, irrespective of series length
???? Teams to be ranked on percentage of points wonThe new points system for #WTC23 is revealed ???? pic.twitter.com/9IglLPKRa1
— ICC (@ICC) July 14, 2021
तर कसोटी मालिकेनुसार गुणांची विभागणी केली आहे. मालिकेत जर दोन सामने असतील तर २४, तीन असतील तर ३६, जर ४ सामने असतील तर ४८ आणि ५ सामने असतील तर ६० गुण मिळतील. मात्र या स्पर्धेची क्रमवारी ही गुणावरुन नाही तर याच गुणावरुन काढलेल्या टक्केवारीवर अवलंबुन असणार आहे. १२ गुण असतील तर १०० टक्के, ६ गुण असतील तर ५०टक्के आणि ४ गुण असतील तर ३३.३३टक्के मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ट्रोलर्सची नजर नको तिथे होती’; हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
