🕒 1 min read
मुंबई : बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही राज्य सरकारांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना नवनीत म्हणाल्या की,’केंद्र सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे संजय राऊत बोलतात पाच आणि दहा रुपयांनी काय होते. केंद्र सरकारने दर कमी करुन महाराष्ट्राला भेट दिली आहे. तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगावे की दिवाळी भेट म्हणून इंधनावरुन कर आकारल्यानंतर येणारा जो १२ रुपये नफा आहे तो कमी करुन सवलत द्यायला पाहिजे. संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही.’
दरम्यान, आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधत राऊत म्हणाले की,’केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही ‘दिवाळी गिफ्ट’ वगैरे म्हणता येणार नाही. शिवाय इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही, म्हणजे पेट्रोल, डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला असे अजिबात होणार नाही. मुळात केंद्राला जर खरंच ‘दिवाळी गिफ्ट’ द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवे होते. मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही. दिले पण हात आखडता ठेवून दिले असेच या इंधन दरकपातीबाबत म्हणता येईल.’
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- इंधनदर कपातीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’, नारायण राणेंचा हल्लाबोल
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा

