मुंबई : घोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ जरी संपली असली तरी त्यातील पात्र लोकांच्या अजूनही मनात घर करून आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’! या मालिकेतील खलनायिका अर्थात ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने ही भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. मात्र, तिच्या एक्झिटनंतर आलेल्या नव्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारने देखील या पात्राचं शिवधनुष्य लीलया पेलले.
केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीची बरीच चर्चा होत असते. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडिओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. सोशल मीडियावर माधुरी इतकी ऍक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहात असेल. तिचा नुकताच ‘जुम्मा-चुम्मा’ या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तिच्या नृत्य शैलीमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. तिच्या मॉडर्न लूकमधील काही व्हिडिओ व फोटोंनी तर युवा पिढीला अक्षरशः भुरळ घातली आहे. मालिकेत नेहमीच साडीवर दिसणाऱ्या माधुरीच्या या बोल्ड डान्सला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. माधुरीच्या लोकप्रियतेमुळे ती प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बोलावली जात आहे.
https://www.instagram.com/p/CMAZhPrFUfH/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन

