Share

Maharashtra Board Exam Time Table | महाराष्ट्र बोर्डाकडून १०वी, १२वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा!

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) SSC आणि HSC बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2022-23 च्या शैक्षणिक सत्रातील इयत्ता 12वी आणि 10वी चे विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत साइटला भेट देऊन वेळापत्रक तपासू शकतात. बोर्डाने नुकतेच जाहीर केलेले वेळापत्रक हे तात्पुरते वेळापत्रक आहे.

बोर्डाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तरी, विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की हे परीक्षेचे वेळापत्रक तात्पुरते आहे आणि यात बदल होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की, या तारखा कायमस्वरूपी नसल्यामुळे, नवीन अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहणे गरजेचे आहे. वास्तविक, शैक्षणिक सत्र संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य मंडळाकडून SSC आणि HSC परीक्षा २०२३ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.

2021 मध्ये कोविड-19 महामारीमुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. कोविड-19 ची परिस्थिती पाहता महाराष्ट्र बोर्डाने वर्षभरापूर्वी दहावी आणि नंतर बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर पुन्हा या वर्षी म्हणजे २०२२ मध्येही बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती, मात्र यावेळी परिस्थिती चांगली झाल्याने महाराष्ट्र राज्य मंडळाने आॅफलाइन परीक्षा घेतल्या. महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये दोन्ही परीक्षा सुरळीत पार पडल्या. यानंतर निकालही वेळेवर जाहीर झाला. त्याचवेळी, आता बोर्डाने आगामी सत्रासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तात्पुरती तारीखही जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!