🕒 1 min read
मुंबई : अभिनेता मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावरून नेहमीच आपलं मत व्यक्त करत असतात. सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करून कोणावर ना कोणावर निशाणा साधत असतात. आता एक व्हीडिओ शेअर करत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खान यांना टोला लगावला आहे.
‘उंचे लोगों की नीची पसंद है’, असं शीर्षक असलेला एक व्हीडिओ मुकेश खन्ना यांनी शेअर केला आहे. तसेच यामध्ये अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी केलेल्या जाहिरातींचे फोटो देखील आहेत.
बोलो जुबां केसरी, ऊंचे लोगों की पसंद, मी उगाच नाही I AM MAN OF ALL SEASONS होत. नेमकं काय आहे हे सगळं? लोकांची दिशाभूल करण्याचा सगळ्यात भयानक मार्ग, असं म्हणत खन्ना यांनी अजय देवगणवर निशाणा साधलाय. हा प्रकार कोणीच थांबवू शकत नाही. सेवन करणारे, प्रचार करणारे किंवा सरकार कोणीच हा प्रकार थांबवू शकत नाही, असं ट्विट मुकेश खन्ना यांनी केलं आहे.
हर किसी के बाप का जाता है ! हर किसी का नुक़सान है। खाने वाले का, प्रचारक का , सरकार का भी। या शायद सरकार का नहीं। क्योंकि लोग कहते हैं कि उन्हें इनसे ढेरों राजस्व मिलता है।पर मैं यहाँ प्रचारक यानी मॉडल की बात करूँगा वो भी स्टार प्रचारकों की। क्यों करते हैं वो ये ग़लत प्रचार !!!
— Mukesh Khanna (@actmukeshkhanna) December 29, 2020
दरम्यान, मुकेश खन्ना यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी सरकारकडे ‘अशा हानिकारक उत्पादनांना परवानगी देऊ नका’, अशी विनंती केली आहे. सोबतच अशा जाहिराती करणाऱ्या काही कलाकारांनी त्यांनी टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्ष आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करणारं असेल : मोदी
- पुण्यातील आयटी नगर परिसरात गव्याचा वावर
- सुनील गावसकर यांच्या मते, सिडनी कसोटीत रोहितसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग
- नूतन वर्षाचे स्वागत ‘या’ गोष्टींचा अंगीकार करून नव्या उत्साहाने करू
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
