Share

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांबाबत घडली होती भयानक घटना; जाणून घ्या

Published On: 

मुंबई : आपल्या मधुर आवाजाने जगभरात नावाजलेल्या, अनेक दशके गाजवणाऱ्या, आपल्या सुरेल आवाजाने अजरामर गीतांनी रसिकांना मोहवणाऱ्या, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर म्हणजेच आपल्या लता दीदींचा आज ९२वा वाढदिवस!

मूळच्या मराठी कुटुंबातल्या असलेल्या लता दीदींनी अनेक भाषेत गाणी गायली आहेत. २८ सप्टेंबर १९२९ साली त्यांचा मंगेशकर कुटुंबात जन्म झाला. मराठी संगीतातील प्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील. लता दीदींनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, वीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. लता दीदींच्या जन्मदिनानिमित्ताने अनेकजण त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.

लता दीदींबाबत एक घटना घडली होती. ती अनेकांना माहीत नाही. एकेकाळी या गानसम्राज्ञीवर विषप्रयोग झाला होता. ज्या वेळी लतादीदींचं गाणं ऐन बहरात येत होतं, त्याच वेळी हा सुमधूर आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. एका मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी ही माहिती दिली होती. हे ऐकून सर्वचजण आवाक झाले.

दरम्यान, लतादीदींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2001 मध्ये त्यांचा गौरव करण्यात आले. त्याशिवाय 3 नॅशनल अवार्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पदमविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. आजही त्यांचे लाखो चाहते जगभरात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!