Share

लॉकडाऊनच्या अफवेनंतर पेट्राल पंपावर नागरीकांच्या लांबच लांब रांगा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पाच दिवस पेट्रोलपंप बंद राहणार असल्याची अफवा शहरात पसरल्यानंतर नागरीकांनी पेट्रोल पंपावर सायंकाळी पाच वाजेनंतर रांगा लावल्याचे बघावयास मिळाले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक वाहतुक करणाऱ्यांनाच पेट्रोल देण्यात येणार आहे. अन्य दिवशी पंप सुरळीत राहणार असल्याचे पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अंशता लॉकडाऊन काळात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहे. शनिवारी व रविवारी असलेल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरीकांनाच पेट्रोल द्यावे अशा सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.

परंतु, पाच दिवस सर्वच पेट्रोल पंप बंद असणार असल्याची अफवा शहरात पसरली. या अफवेनंतर नागरीकांनी पंपावर रांगा लावल्याचे दिसून आले. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून ठेवल्या. दरम्यान, अफवेवर विश्वास ठेऊ नये. दोन दिवस केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना पेट्रोल देण्यात येणार आहे. उर्वरित दिवशी पंप सुरूच राहणार असल्याचे पंप चालकांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!