मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे.
अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे. रविवारी अमरावती जिल्हात लॉकडाऊन पाळला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून हा लॉकडाऊन सुरू होणार असून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन रहाणार आहे.
रविवारी जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू राहतील, अशी माहिती ही अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारवर टीका करा, नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही – नाना पटोले
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
- ‘आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, पण काँग्रेसचं सरकार आल्यानंतर वीजबिल माफ करू’


