Share

मोदी सरकारवर टीका करा, नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही – नाना पटोले

Published On: 

औरंगाबाद : आमचे सरकार सत्तेवर असताना पेट्रोल दर वाढीच्या मुद्यावर तुम्ही सरकारवर टीका केली होती. आता मोदी सरकार सत्तेत आहेत, पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही मोदी सरकारवर टीका करा. नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. त्यांच्या या इशारामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळालंय.

भारतीय स्वातंत्र्यापासून कायम सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कोणत्याच प्रदेश अध्यक्षाने अशा प्रकारची भाषा वापरली नव्हती. परंतु नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पटोले हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षातील संस्कृती वेगवेगळी आहे. प्रदेशाध्यक्ष पद स्विकारतांनाच पटोले यांनी केलेले शक्तीप्रदर्शन आणि सोहळा हा काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच निदर्शनास आला होता. त्याच वेळी हे प्रदेशाध्यक्ष वेगळ्या धाटनीने काम करतील असा अंदाज विश्लेषकांनी लावला होता. मात्र, थेट कलाकारांना काम न करू देण्याचा इशारा ते देतील याचा अंदाज नव्हता. यामुळे विरोधकांसह राजकीय अभ्यासकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.

काँग्रेस पक्षाची स्वत:ची वेगळी परंपरा आहे. त्या परंपरेत पटोले यांचे हे विधान बसणारे नक्कीच नाही. मात्र, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेसमध्ये अनेक बदल होताना दिसत आहे. त्याच बदलाचा हा एक भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र, काँग्रेसमधील इतर ज्येष्ठ नेते याकडे कसे पाहता, यावर या भूमीकेची दिशा अवलंबून राहील.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस कायम बॅकफुटवर दिसून आली होती.  मात्र, पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आल्यानंतर काँग्रेस पुन्हा उभारी घेईल असा अंदाज लावला जात होता. पटोले हे आधीपासूनच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यात त्यांनी दाखवलेल्या या ‘ठाकरे’स्टाईल बाण्यामुळे त्याची चांगलीच प्रचिती आलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!