मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
राज्यात काल नव्या कोरोना बाधितांचा आकडा ४० हजारांखाली आल्याची नोंद जरी करण्यात आली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता व सध्याची रुग्णसंख्या ही देखील आटोक्याबाहेर असल्याने कोविड टास्क फोर्सने लॉकडाऊन ३० मे वाढवण्याचा सल्ला दिला आहे. १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये देखील पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्राचं कौतुक केंद्रीय स्तरावर केलं जात असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रासह काही शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे.
बुधवारी कॅबिनेट बैठक होणार असल्याची माहिती समोर येत असून राज्यातील निर्बंध अधिक कडक वा आहे तसेच लॉकडाऊन वाढवले जाणार का ? याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लॉकडाऊनबाबत मुंबईतील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात,’ असं राजेश टोपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, मोदीजी तो गुलाबी चष्मा आतातरी काढा’
- १८-४४ वर्षांवरील लसीकरणाचा वेग मंदावणार ; जेष्ठांना प्राधान्य
- आता न्यायपालिकेवर विश्वास नाही, जनता हेच सर्वात मोठं न्यायालय; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला


