परभणी : वर्षभरापासून सातत्याने होत असलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे काय होईल, या विवंचनेतून २० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. शुभम गंगाधर उगले ( २०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला आहे.
परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील शुभम उगले हा 20 वर्षीय युवक परभणी येथील एका महाविद्यालयात प्रथम वर्गामध्ये शिक्षण घेत होता. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे शाळा – महाविद्यालये बंद आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात होत आहे. शिक्षणाचे पुढे काय होणार, या विवंचनेत शुभम् उगले खुप दिवसांपासून होता. त्याने याच विचारात असल्याने राहत्या घरी छतावरील पंख्यास साडी बांधून गळफास घेतला.
या घटनेची माहिती कळताचा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेभाऊ चव्हाण, फौजदार काजी, कर्मचारी सुभाष चव्हाण यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस कर्मचारी सुभाष चव्हाण हे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
