Share

‘तिच्या आई-वडिलांना विनाकारण त्रास होत आहे’ आयकर कारवाईनंतर तपासीच्या प्रियकराची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.

‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली गेली. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणी या अभिनेत्यांवर छापेमारी करण्यात आली.

फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. तिची स्थापना २०१० मध्ये झाली. अनुराग कश्यप, विकास बेहेल, मधू मंटेना यांनी फँटमची उभारणी केली. चित्रपट निर्मिती आणि वितरणाचं काम फँटम कंपनी करते. अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं २०१८ मध्ये त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला.

यावर आता अभिनेत्री तापसी पन्नू हिने आणि तिचा प्रियकर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर लिहिताना तिने म्हटले आहे की, “३ दिवसांच्या शोधात प्रामुख्याने ३ गोष्टींचा समावेश आहे. १. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. २. मी याआधीच नाकारलेल्या ५ कोटी रकमेची “कथित” पावती. ३ सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मधील माझ्यावर टाकलेल्या छापाची आठवण. ” असे तीन म्हटले आहे.

त्याच बरोबर काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने देखील ट्वीट करात आपली प्रतिक्रिया दिली असून त्यने हे ट्वीट केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केल आहे. बोई म्हणला की, “मी थोडा गोंधळलो आहेत. पहिल्यांदाच काही महत्वाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक म्हणून भारताचं नेतृत्व करत आहे. यादरम्यान तापसीच्या घरावर आयकराने धाड टाकत आहे, यामुळे कुटुंबाला आणि खासकरुन तिच्या आई-वडिलांना विनाकारण त्रास होत आहे. किरेन रिजिजू कृपया काहीतरी करा”. अशी विनंती त्याने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!