Share

नगर जिल्ह्यात ६१ गावात पुन्हा लॉकडाउन; औरंगाबाद प्रशासन ‘ऑन हाय अलर्ट’!

Published On: 

औरंगाबाद :अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने तब्बल ६१ गावात पुन्हा लॉकडाउन लावण्यात आले आहे. शेजारील जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून शहरात येणाऱ्या महामार्गावर पुन्हा तपासणी नाके उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल तातडीची बैठक घेतली. आरोग्य विभाग, पोलीस, महानगरपालिका यासह इतर विभागांच्या प्रमुखासोबत झालेल्या बैठकीत खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादेत येणाऱ्या ६ प्रवेश द्वारावर तपासणी नाके पुन्हा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर कोरोना नियमावलीचे कठोर पालन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गर्दी होण्याचा धोका आहे. त्याच बरोबर नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी शहरात येत असतात. त्यामुळे पोलिस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांची तैनाती, विशेष टीमचे गठण आणि धार्मिक स्थळा जवळ पोलिसांची अधिक कुमक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर महामार्गावरही पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील गर्दी होणारी ठिकाणे त्याचबरोबर ग्रामीण भागातील बाजारपेठा, धार्मिक स्थळे या ठिकाणी गर्दी नियंत्रण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.

याठिकाणी उभारणार चेक पोस्ट

लॉक डाऊनच्या काळात शहरातील प्रमुख मार्गावर आरोग्य विभागाच्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. याहीवेळी चिकलठाणा जवळील केंब्रिज चौक, तसेच हसूल टी पॉईट, नगर नाक्यावरील गोलवाडी फाटा, कांचनवाडी, दौलताबाद रस्त्यावरील शरणापुर फाटा तसेच झाल्टा फाटा येथे चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!