औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहे. या माध्यमातून त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासकांमार्फत सत्ताधाऱ्यांची सत्ता कायम ठेवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी न थांबता, सर्व निवडणुका नियोजित वेळेत घ्याव्यात, अशी आमची भूमीका असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, या संदर्भात मला वारंवार प्रश्न विचारले जात आहे. मात्र, आम्ही आमची भूमीका स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमताने निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांना ओबीसी आरक्षणासाठी नाही तर, सत्ता आपल्याकडे कायम ठेवायची असल्याने राजकीय पक्ष ही मागणी करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम वंचित आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांना स्वत:च्या पराभवाची भीती असल्याने ते निवडणुकाच होवू देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धाडीवर अजित पवारांचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाले…
- ओबीसी आरक्षणाचा तिढा ‘या’ महिन्यापर्यंत संपणार; मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितली डेडलाईन
- सरकारी संस्था विकायला काढल्याची टीका करत चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा
- ‘बिंज बार’ खाद्यप्रेमींसाठी एक नवी पर्वणी; मन होईल तेव्हा भेळ आणि चिवड्याच्या पारंपारिक चवीचा घ्या आस्वाद !
- ‘पुन्हा सांगतोय, भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा’; चंद्रकांतदादांचे शिवसेना खासदाराला आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

