Share

‘पुन्हा सांगतोय, भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा’; चंद्रकांतदादांचे शिवसेना खासदाराला आव्हान

Published On: 

अकोला : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून सर्वाधिक आमदार असून देखील ऐनवेळी शिवसेनेशी युती तुटल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हल्लाबोल केला आहे. दोन दशकांहून अधिक काळाची मैत्री राहिलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत आहेत.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या टीकांना प्रत्युत्तर देताना बोचरी टिपण्णी केली होती. आता यावरून चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला असून भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा, असं खुलं आव्हान दिलं आहे. सध्या ते विदर्भ दौऱ्यावर असून आज अकोल्यात बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

‘अरविंद सावंत म्हणत आहेत, की दादांचं डोकं खराब झालंय. जसं काय हे डॉक्टरच आहेत. कधी म्हणतात यांच्या पोटात दुखतं सरकार न आल्याने, कधी म्हणतात डोकं बिघडलयं.. हे डॉक्टर आहेत का? मी काल अरविंद सावंत यांना जाहीरपणे म्हटलो आज पुन्हा म्हणतोय भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा. मग कळेल भाजपाची काय ताकद आहे,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!