पुणे : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावर आता उपमुख्यमंत्री यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
कोणी कोणाचा राजीनामा घ्यावा हा त्या-त्या पक्षाचा संबंध आहे. पण पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. हे शहरवासीय उघड्या डोळ्याने हे पाहता आहेत. भाजपची महापालिकेत सत्ता असताना हा प्रकार घडला आहे. वास्तविक पाहता मी सुद्धा या शहराचे २० वर्षे नेतृत्व केलं आहे. पण अशा गोष्टी घडू दिल्या नाहीत, असं अजित पवार म्हणाले आहेत.
त्यातही यदाकदाचित असे प्रकार नजरेस आले तर मी संबंधितांवर कडक कारवाई करताना मागे पुढं पाहिलं नाही. कारण जनतेच्या कर स्वरूपातून आलेला हा पैसा असतो, त्यावर असा डल्ला मारण्यासाठी कोणी पुढाकार घेत असतील तर हे पिंपरी-चिंचवडचे दुर्दैव्य आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, कोणीही असो, चौकशीत ते समोर येईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अधिकच भाष्य करणं योग्य होणार नाही. पण ते राष्ट्रवादीशी संबंधित असतील तर आम्ही योग्य ती कारवाई नक्की करू, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे पाटील आता म्हणाले, ‘युतीचा विचारही होऊ शकतो’
- ‘मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक’ ; राहुल गांधींचा हल्लाबोल
- आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!
- बीडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा जुंपली; आमदार पुतण्यावर काका क्षीरसागरांचे गंभीर आरोप
- शुटिंगच्या वेळी घोड्याचा मृत्यू; दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याविरोधात तक्रार दाखल


