परभणी : परभणीसह परिसरामध्ये दोन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसाने येथील बसस्थानकासह परिसरात चिखलमय झाला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तसेच ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना देखील कसरती करत ये – जा करावी लागत आहेत. या चिखलमय रस्त्यातून मार्ग काढत नियोजित एसटी गाठण्यासाठी खुप त्रास देखील सहन करावा लागत आहे.
दीड – दोन वर्षांपासून येथील तात्पुरत्या बसस्थानकाची अवस्था खुप वाईट झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची वाट बघण्यासाठी बसण्याकरिता पुरेसे शेड देखील नाहीत. पुरेशी आसन व्यवस्था, पंखे, पुरेसे दिवे देखील येथे नाहीत. जिल्ह्याभरातून परिसरातून बसेस ये – जा करत असतात. परंतू ;चांगल्या रस्त्या अभावी या बसेसमुळे धुळीचे लोट सातत्याने उठताना नेहमी दिसतात. त्यातच परिसर अस्वच्छ असल्याने तेथे डास, दुर्गंधी असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. सामान्य प्रवाशी, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
बसस्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था देखील वाईट झाली आहे. तर बसस्थानकापासून स्वच्छतागृह बरेच दुर आहे. तसेच बसेस या बेशिस्त पद्धतीने बसस्थानकात उभ्या असतात. नियोजित करुन दिलेल्या जागेवर बसेस उभ्या राहत नसल्याने बाहेरगावाहून ये – जा करणाऱ्या प्रवाश्यांना मानसीक तसेच शारिरीक ताण सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना कोणत्या बसेस कुठे उभ्या, कोठे जाणाऱ्या आहेत याची अचूक माहिती मिळत नाही. या सह अनेक गैरसोईचे माहेर घर म्हणजे परभणी बसस्थानक म्हटले तर वावगे ठरु नये. या बसस्थानकात दोन दिवसांतील पावसामुळे परिसरात मोठी दाणादाण उडाली आहे. रस्ते चिखलमय बनले आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण करुन तत्काळ सर्व सोईयुक्त बसस्थानक बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिट करून आठवड्यात आराखडा सादर करा: जिल्हाधिकारी
- “चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली”
- ‘मंत्री संजय राठोड गायब का?’, तृप्ती देसाईंची पूजा चव्हाणच्या घरी भेट
- अब्दुल कलाम हा वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता ; मोदींना श्रेय देऊ नये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
