नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आखत्यारीतील साखर कारखान्याला तामिळनाडूतील एका कंपनीने ६ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ३ आणि ४ ने साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीने साखर कारखान्याची फसवणूक केली आहे. यातील दोघांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.भांबरे यांनी चार दिवस २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याच्या कंपनीची फसवणुक झाल्याचे प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते.
साखर कारखान्याने दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र-३ हदगाव आणि युनिट क्र-४ वाघलवाडा यांच्या साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव कारखान्याला केंद्रशासनाकडून प्रतिटन काही आर्थिक मदत मिळत असते. पण संबंधित कंपनीने मात्र निर्यात केल्याची कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारली असल्याचा ईमेल पाठवला.
पण त्यांच्याकडे अशी कुठलाही पुरावा नसल्याचे कारखान्याच्या लक्षात आले. यामुळे केंद्र शासनाकडून मिळणारी रक्कम ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपये आता मिळणार नाही. संबंधित कंपनीने कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात चेन्नई येथील कुरुंजी प्रो नॅचरल फूड्स वलसरावक्कम चेन्नईचा चेअरमन इडिगा मनिकांता, प्रतिनिधी अभिजीत देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. त्यांना चार सप्टेंबर पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

