मुंबई : अभिनेता मोहित रैनाने चार जणांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोहित विषयी एक दावा केला जातं आहे. मोहितने ही तक्रार सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘सेव्ह मोहित’ या मोहिमेवरून केली आहे.
मोहित त रैनाविषयी त्याची शुभचिंतक सारा शर्माने सोशल मीडियावर ‘सेव्ह मोहित’ मोहीम चालवली होती. ती म्हणाली की, मोहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो. या घटनेनंतर बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या. यात मोहितने सांगितले की, त्याला सारा शर्मा, परवीन शर्मा, आशिव शर्मा आणि मिथीलेश तिवारी हे त्रास देत आहेत.
https://www.instagram.com/p/CPAIvkGrH4v/?utm_source=ig_embed&ig_rid=5df6fce2-9f14-48d8-963f-33ebb112dbd9
यानुसार पोलिसांनी या चौघांवर कलम ३८४ आयपीसी अंतर्गत गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोहितने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट आणि ‘भौकाल’, ‘काफिर’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तर ‘ देवो के देव महादेव’ या मालिकेमध्ये तो पाहायला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार’
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…


