🕒 1 min read
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी प्रश्नी सध्या आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांनी खरमरीत टीका केली आहे. शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी, पवार सारखेच आहेत, किंबहूना त्यांचं एकमत आहे, अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे.
ऊसाची एफआरपी एकरकमी देण्यात यावी असा आग्रह राजू शेट्टींनी धरला आहे. मात्र एकरकमी एफआरपीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा नाही. गुजरातमध्ये तीन हप्ते दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, असे शरद पवार म्हणाले होते. या पवारांच्या विधानावर राजू शेट्टींनी टीका केली आहे.
शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसतं मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचं एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधी शड्डू ठोकणारा पहिला मी असेन, असेही राजू शेट्टी म्हणाले.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
