मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. आता पुन्हा केदा सामान्य लोकांना झटका बसला आहे. कारण आता पुन्हा एकदा आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकरणी सर्वसामान्य जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक बोजा आणखी वाढणार असून खर्चाचा मेळ बसवणे अधिक अवघड जाणार आहे.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांच्या किंमतीमध्ये होणाऱ्या वाढीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपसह मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ‘केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन आणि गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती. ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे,’ असा घणाघात पटोले यांनी केला आहे.
‘जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला. एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही,’ असं देखील पटोले यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
- ‘तुम्ही केलेला गुन्हा सामान्य नाही’ ; न्यायालयाचा आसाराम बापूला ‘सर्वोच्च’ धक्का
- पिंपरी-चिंचवडकरांना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभी करणार
- महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट ; रविवारी टास्क फोर्सची महत्वाची परिषद
- ‘मोदी हे आमचे आई बाप; तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं चालेल का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

