Share

कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम, आता पगारासाठी वाट बघण्याची आली वेळ!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर महापालिकेमुळे उपासमारीची वेळ आली होती. निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत प्रशासन पगार करण्यापासून पळ काढत होते. अखेर राज्य आपत्ती व्यवस्थापनाने महापालिकेला निधी दिला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग आता काही प्रमाणात मोकळा झालेला आहे. मात्र अजूनही निधी लागणार आहे. यातून संपूर्ण पगार करता येणार नाही. त्यामुळे कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या कर्मचारी वर्गाच्या पदरी निराशाच आली आहे.

८०० कंत्राटी कर्मचार्‍यांचा पगार मागील चार महिन्यांपासून रखडलेला होता. मात्र निधी उपलब्ध नसल्याने प्रशासनाला पगार करण्यास अडचणी येत होत्या. अखेर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी १ कोटी २५ लाख रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे आता या कर्मचार्‍यांच्या पगाराचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पालिका स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून निधीची मागणी केली जात आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना उपाययोजना निधी राबविण्यासाठी ८०० कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये आयुष डॉक्टरांसह इतर डॉक्टरांचा देखील समावेश आहे. या कंत्राटी कर्मचार्‍यांना मार्च २०२१ पासून पगार मिळालेला नाही. चार महिने उलटून गेले तरी पगार मिळत नसल्यामुळे या कर्मचार्‍यांनी पालिका प्रशासकांसह आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन पगार करण्याची मागणी केली होती. मात्र निधी नसल्याचे कारण देत पगार करण्यात आला नाही. दरम्यान राज्य कार्यकारी समितीने औरंगाबाद विभागास कोरोना उपयायोजना करण्यासाठी निधी वितरीत केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!