Share

केंद्र सरकारने राज्यांना लिहिले पत्र ; ‘कोरोनाची लस देण्यापूर्वी ती बनावट तर नाही ना हे तपासा’

Published On: 

मुंबई : कोरोना हा रोग अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे सर्वांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात व्यापक लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. त्यातच आता भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटने (WHO) च्या तपास विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक बाबीला खुद्द सिरम इन्सिटीट्युटने दुजोरा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे. नागरिकांना करोनाची लस देण्यापूर्वी ती बनावट आहे की नाही? हे बघावं, अशी सूचना केंद्राने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटने ‘अशा प्रकारच्या बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून करोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणं हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे’, असं देखील आपल्या वेबसाईटवर नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!