🕒 1 min read
इंग्लंड : द ओव्हल येथे रोहित शर्माच्या खेळीने प्रभावित झालेले क्रिकेट दिग्गज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माचं कौतुक केल आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील परदेशी भूमीवर त्याचे हे पहिले शतक होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या दिवसअखेर 270/3 धावा केल्या होत्या. तसेच भारतीय संघाकडे 171 धावांची आघाडी आहे.
रोहितच्या खेळीने प्रभावित होऊन गावस्कर म्हणाले, ‘मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाने रोहित शर्माला आजच्या खेळाडूमध्ये बदलले आहे. रिकी पाँटिंगने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहितकडे सोपवले त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने हंगामाच्या मध्यभागी पद सोडले. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितने या मुंबई संघाला पाच जेतेपदं दिली आहेत.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या म्हणण्यानुसार, गावस्कर यांनी रोहितचे कौतुक केले आणि म्हणाले, ‘अविश्वसनीय खेळी. त्याने खूप प्रभाव पाडला. त्याने नवीन चेंडूचा स्विंग खूप चांगल्या प्रकारे कव्हर केला. हे केवळ या डावातच दिसले नाही, तर आधीच्या सामन्यांमध्येही दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
