🕒 1 min read
कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank election) निकाल आज लागणार आहे. शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी थेट लढत असलेली ही निवडणूक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ती म्हणजे मतदान पेटीत चक्क चिठ्ठ्या अन् पैसे सापडले आहे.
या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा याचीच आता चर्चा आहे. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा… आता काय? ‘सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.
‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असेही एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर पन्नास रुपयेही मतमोजणीवेळी सापडले आहेत. त्यामुळे हा कोल्हापुरी ठसका या निवडणुकीत पहावयास मिळाला आहे.
दरम्यान आतापर्यत आलेल्या निकालानुसार विकास सेवा संस्थातून पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना ९८ मते मिळाली. विरोधी गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. तर, पन्हाळा गटातून आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत. शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड. आजरा गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, गडहिंग्लज संतोष पाटील विजयी झाले आहेत. मात्र यापेक्षा मतदारांनी टाकलेल्या चिठ्ठ्याचीच जास्त चर्चा रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- प्रियांका चतुर्वेदींनी ब्लॉक करताच राम सातपुते म्हणाले, “एवढा राग आरोग्यासाठी चांगला नाही मॅडम”
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- साखर कारखान्यांना प्राप्तीकरापासून मुक्त करण्याचा निर्णय-चंद्रकांत पाटील
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
