Share

प्रियांका चतुर्वेदींनी ब्लॉक करताच राम सातपुते म्हणाले, “एवढा राग आरोग्यासाठी चांगला नाही मॅडम”

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाबमधील दौऱ्यावेळी निर्माण झालेल्या सुरक्षा त्रुटीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरच शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशाचे गृह मंत्रीही तितकेच दोषी असल्याची टीका केली होती. त्यावरच आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत ‘मॅडम, पार्टी तो बदली लेकिनी काँग्रेसवाली घटिया और गंदी सौच नही बदली.’ असे म्हटले होते. यांनतर प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राम सातपुते यांना ब्लॉक केले. आता ब्लॉक करताच राम सातपुते(Ram Satpute) यांनी त्याचाही फोटो ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.

‘सोनिया सेनाच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मला तर मला ब्लॉक केले, मात्र एवढा राग आरोग्यासाठी चांगला नाही. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा आजार लवकर जडतो.’ असे खोचक ट्वीट राम सातपुते यांनी केले आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला अगोदरच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!