Share

“पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी(Charanjeet Sing Channi) यांनी हे सर्व पंतप्रधानांचे नाटक असून पंजाबमधील लोकशाही सरकार पाडण्याच्या उद्देशाने असे करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.

गुरुवारी(६ जाने.)लुधियानाच्या मच्छीवाड़ा येथे एका कार्यक्रमात बोलत असतांना चन्नी म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. तसेच पंतप्रधान हे देशाचे आदरणीय नेते असून त्यांच्या पदानुसार त्यांना हे नाटक शोभत नाही.’ पुढे ‘मोदींच्या सुरक्षेला धोका वाटत असेल तर पंतप्रधानांच्या जवळचे गुप्तचर अधिकारी काय करत आहेत?’, असा सवालही चन्नी यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या त्रुटीनंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत चर्चा केली असून पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहे. त्यांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे होती. पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ‘असे सोनिया यांनी मुख्यमंत्री चन्नी यांना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!