मुंबई : साखर उद्योगासाठी मोदी सरकारने इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात प्रथमच १९८५ पासून लावण्यात येणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तीकरापासून मुक्त करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.
शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा अधिक दिलेला दर हा नफा समजून आणि त्यावर लावलेला प्राप्तिकर हा उत्पादनखर्च समजून साखर कारखान्यांवर दाखल करण्यात आलेले दावे निकाली काढण्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अवर सचिव सौरभ जैन यांनी काढले आहेत.
साखर उद्योगासाठी मोदी सरकारने इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमित शहा जी यांच्या नेतृत्वात प्रथमच १९८५ पासून लावण्यात येणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तीकरापासून मुक्त करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 7, 2022
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना या विषयाच्या गांभीर्याची माहिती दिली होती. यानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी मोठा दिलासा दिला आहे. हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल अमित जींचे मनःपूर्वक धन्यवाद!, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी

