मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.
आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. तर, गेल्या काहीच दिवसांपूर्वी राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची देखील आंतरजिल्हा सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र, खाजगी वाहनाने प्रवास करायचा असल्यास ई-पासची असलेली सक्ती राज्य सरकारतर्फे कायम ठेवण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांकडे विचारणा केली आहे की सध्याच्या अनलॉक-3 मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे व्यक्ती आणि वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन घालू नये.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ‘ही’ परंपरा कोरोनाकाळात देखील अखंडीत
सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे, की विविध जिल्हा, राज्यांतून स्थानिक पातळीवरील हालचालींवर निर्बंध लादले जात आहेत. अशा निर्बंधांमुळे वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्यीय समस्या निर्माण होत आहेत. पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे, परिणामी आर्थिक कामे व रोजगार विस्कळीत होण्याव्यतिरिक्त वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण
ई-पास बंद करणे, आंतरराज्यीय वाहतूक पुन्हा सुरु करणे याबाबतचा निर्णय राज्य सरकारवर असल्याने आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे महत्वाचे मानले जात आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, ‘ राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय मालाची आणि लोकांच्या दळणवळण बाबतीतल्या नव्या नियमावली तसेच निर्बंध हटवण्याच्या घोषणेची दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हिंदू मुलींची पठाण मामानं केली पाठवणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

