Share

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ‘ही’ परंपरा कोरोनाकाळात देखील अखंडीत

Published On: 

पुणे : दरवर्षी बाप्पाचे आगमन जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरावणुकींनी होत असते. बाप्पा नयनरम्य अशा देखाव्यांमध्ये विराजमान होतात. यंदा मात्र गेले ५ महिने जगभर थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे सावट या गणेशोत्सवावर असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जल्लोषात जरी बाप्पाचे आगमन झाले नसले तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमतरता नसल्याचे काल राज्यभरात दिसून आले.

गेले अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऋषीपंचमीला हजारो महिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या समोर अथर्वशीर्ष पठण करतात. दगडूशेठ हलवाई गणपती जेथे विराजमान होतो तेथे पहाटे लवकर हजारो महिला एकत्र येत अथर्वशीर्ष पठण करतात. यावेळी वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण होत असते. या उपक्रमाचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे.

काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण

कोरोनाच्या संकटामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्यात आली आहे. तसेच, कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना एकत्र येण्यास मनाई असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र येणे शक्य नव्हते. परंतु, परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी ५ महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी, हजारो नागरिकांनी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

हिंदू मुलींची पठाण मामानं केली पाठवणी!

शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या पाच महिलांना मुख्य मंदिरातून प्रत्यक्ष अथर्वशीर्ष पठणाचा मान मिळाला. सकाळी ६ वाजता शंखनादान या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाची सुरुवात झाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व ऑननलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

राज्य सरकारचा तुकाराम मुंढेच्या ‘त्या’ नियमाबाबत व्यापाऱ्यांना दिलासा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!