कोल्हापूर : गेले ५ महिने कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. या रोगाने अनेक राजकीय नेत्यांसह, बॉलिवूड स्टार्स आणि केंद्रीय मंत्र्यांना देखीक विळखा घातल्याचे दिसून आले आहे. आता, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेचे तत्कालीन दमदार आमदार राजेश क्षीरसागर यांना पराभूत केले होते. आमदार चंद्रकांत जाधव यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. ” माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. आज (दि.२२ ऑगस्ट) रोजी सायंकाळी रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.”
हिंदू मुलींची पठाण मामानं केली पाठवणी!
काल संध्याकाळी चंद्रकांत जाधव यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तर, दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले होते. आमदार ऋतुराज पाटील हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे व शिक्षणमहर्षी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आहेत. त्यामुळे, कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनधींनाच कोरोनाने ग्रासले असून नागरिकांच्या चिंतेत देखील वाढ होत आहे.
राज्य सरकारचा तुकाराम मुंढेच्या ‘त्या’ नियमाबाबत व्यापाऱ्यांना दिलासा

