अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे १३ ऑगस्ट रोजी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत बाबाभाई पठाण या मुस्लिम युवकाने हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या लग्न सोहळ्याची दखल घेतली आहे. पठाण यांच्या धार्मिक सलोख्यावर हा माझा भारत आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे.
बोधेगाव येथील बाबाभाई पठाण यांच्या घरासमोर भुसारी कुटूंब राहते. पतीशी पटत नसल्याने त्यांची मुलगी सविता दोन मुली आणि एक मुलासह माहेरी निघून आली होती. धुणी भांडी करून सविताने मुलांना वाढविले, शिकविले. घरासमोरच राहणारा बाबाभाई यांना सविता भाऊ मानते. सविता यांना सख्खा भाऊ नाही. अनेक वर्षांपासून हे मानलेले नाते आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण दोघेही सख्या नात्याप्रमाणे साजरे करतात.
राज्य सरकारचा तुकाराम मुंढेच्या ‘त्या’ नियमाबाबत व्यापाऱ्यांना दिलासा
सविताच्या मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची एक मुलगी गौरी बी.ए. झाली तर धाकटी सावरी हिची बारावी झाली. दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तिथेही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न एकत्रच करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला दोन्ही घरांतून मान्यता मिळाली.
राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार

अलीकडेच बोधेगावमध्ये हे लग्न झाले. कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या लग्न सोहळ्यात अर्थातच मामा म्हणून बाबाभाईच होते. सख्या भाच्यांचे लग्न असल्यासारखे त्यांनी यात भाग घेतला. लग्नात तरी आपले वडील असावेत, ही मुलींची इच्छा सुद्धा त्यांनी पूर्ण केली. मुलींच्या वडिलांची समजूत काढून त्यांना लग्नापुरते बोलावून आणले. पाठवणीपर्यंतचे सर्व विधी बाबाभाईंनी मामा या नात्याने पार पाडले. सासरी निघालेल्या दोन्ही मुलींनी शेवटी या दिलदार मामाच्या गळ्यात पडूनच आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली.
विघ्नहर्त्याचे आगमन झाले मात्र राज्यात कोरोनाचे संकट कायम! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ‘तब्बल’ इतका


