Share

“झुकेंगे नही म्हणणारे…”; व्यंगचित्र ट्विट करत भातखळकरांची शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मंत्री नवाब मलिक अटक प्रकरण, ओबीसी आरक्षण, मविआ नेत्यांवर होणाऱ्या ईडी कारवाया यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता हे प्रश्न सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे झाले आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र पहिलाच दिवस घोषणा, आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. त्यातच आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी खोचक व्यंगचित्र ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,(Sharad Pawar)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान या व्यंगचित्रामध्ये ‘सर नही झुकाएंगे’ म्हणत ED समोर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले मान उंचाऊन उभे आहेत. तर ‘सर नही उठाएंगे’ म्हणत कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमसमोर हे तिन्ही नेते झुकताना दाखवले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद आणि हसीना पारकर यांच्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना सध्या ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नाहीये. यावरूनच भाजपने मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यामागे संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे असल्याचा आरोप केला आहे. तसेच सत्ता जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नसल्याचेही भाजपने म्हटले आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या मध्ये फसली असल्याचे आता म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!