Share

स्कुल चले हम! पाचवीचे वर्ग सुरू, ५० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

Published On: 

औरंगाबाद : तब्बल अकरा महिन्यानंतर सोमवारी (दि.८) इयत्ता पाचवीच्या शाळांची घंटा वाजली. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी सकाळपासूनच शाळेच्या गेटसमोर हजेरी लावली. थर्मल गनने तपासणी करून आणि पालकांचे संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही ५० टक्केच बोलविण्यात आले आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शाळेत जाण्याची ओढ मुलांमध्ये दिसून आली.

मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली. सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर टप्या टप्प्यात हळूहळू बाजारपेठ आणि शाळा उघडण्यात आल्या. ईयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. त्यातही प्रतिदिन विद्यार्थ्यांना रोल नंबर नुसार ५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता ईयत्ता पाचवीचे वर्ग देखील आजपासून सुरू करण्यात आले आहेत.

अकरा महिन्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन वेलकम म्हणत यावेळी स्वागत करण्यात आले. पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नका. असे आदेश असल्याने आज पहिल्याच दिवशी पालकांचे संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना केवळ दप्तर आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल आणण्यासाठी परवानगी देण्यात आली. जेवणाचे डब्बे आणायचे नाही असे देखील आदेश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी देखील नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!