मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलेच तापलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे.
‘आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचा पुन्हा एल्गार ठरला असून याची सुरुवात बीडमधून होणार आहे. राज्य सरकारने मराठ्यांचा असंतोष दिसू नये, मराठ्यांनी आंदोलन करू नये, रस्त्यावर उतरू नये. यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र येणाऱ्या 5 तारखेला आरक्षणासाठी भव्य मोर्चा बीडमध्ये काढणार आहोत,’ अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी यावेळी दिली आहे. तर ‘याविषयी आम्ही 18 तारखेला प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयाला इशारा निवेदन देणार आहोत. त्या दिवशी राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत. तर या मोर्चाच्या नियोजनासाठी कोरोनाचे नियम पाळून आता प्रत्येक गावात घोंगडी बैठका घेतल्या जाणार आहेत,’ अशी देखील माहिती आमदार मेटेंनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. ‘ मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील. पण पक्षाचं नाव राहणार नाही. कोरोनाचा फायदा घेऊन आंदोलने होऊ नये म्हणून कठोर निर्बंध टाकले जात आहेत. मराठा तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांच्या जिंदगीचा प्रश्न आहे. एक दिवस उशिरा स्टे मिळाला असता तर किती जणांना प्रवेश मिळाला असता याची यादीही खूप मोठी आहे.
मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील. पण पक्षाचं नाव राहणार नाही, असं सांगतानाच आम्हीही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. मराठा आरक्षणात आघाडी सरकार कुठं कमी पडलं याची पोलखोल करण्याचं काम ही समिती करेल, असं ते म्हणाले. मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे.’ असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आवाज आणि आंदोलन दाबण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचे षड्यंत्र असा गंभीर आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. मात्र 31 तारखेनंतर लॉकडाऊन असले तरी 5 जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा काढणार आहोत तो कुठल्याही कारणास्तव रद्द केला जाणार नाही. असे देखील यावेळी मेटे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना : आता लढाई आणखी कठीण होणार, सज्ज रहा – मुख्यमंत्री ठाकरे
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- ‘मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला’, पंकजा मुंडेंच्या भावना
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू ; मायकल वॉनची अशी घेतली शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

