Share

बागबान चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचा पत्नीसह अपघात

Published On: 

मुंबई : बॉलीवूडचे महानायक बीग-बी यांचा गाजलेला चित्रपट बागबान मधील अभिनेता साहिल चड्डा आणि त्यांची पत्नी यांचा एक अपघात झाला आहे. साहिल यांची गाडी ही एका रुग्णवाहिकेला धडकल्याने हा अपघात घडला.

अभिनेते साहिल चड्डा आणि त्यांची पत्नी कारने काही कामानिमीत्त बाहेर जात होते. या दरम्यान समोरुन येणाऱ्या रुग्णवाहिकेला त्यांच्या गाडीची धडक बसली. या अपघातात साहिल आणि त्यांची पत्नी दोघांनाही दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात साहिल यांच्या पत्नीच्या दोन्ही पायांना फॅक्चर झाले असल्याची माहिती मिळते. साहिलच्या माहितीनुसार पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला ताब्यात घेतले आहे.

काही दिवसापुर्वीच साहिल आणि त्यांची पत्नी प्रेमिला यांना कोरोनाची लागण झाली होती. २० दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर दोघांनी कोरोनावर मात केली. आता नेमकी दोघांची तब्येत एकदम ठणठणीत होती. साहिल चड्डा यांनी बागबान, आणि काही वर्षापुर्वी आलेल्या सेक्शन ३७५, थोडी लाइफ थोडी मॅजिक या सारख्या चित्रपटात काम केले आहे. बागबान या चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहोचले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!