मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
येत्या काळात कोरोना विरोधातील लढाई अधिक कठीण होणार असल्याने राज्य सरकारने अधिकच्या खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत करोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.
यावेळी, ‘७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणं नसणारे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण काही दिवसांनी मृत्यूदर वाढला असं लक्षात येतं. तेथील डॉक्टर रुग्ण उशीरा आल्याचं सांगतात. घरच्या घऱी अंगावर गोष्टी काढल्या जाता. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणू शकता. ही लक्ष्मणरेषा ओळखायची कशी हे काम तुम्ही करायचं आहे. घरच्या घरी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचललं पाहिजे. घरच्या घरी उपचार घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. पण त्यांच्या उपचारावर लक्ष देणं, योग्य औषध देणं यासाठी तुम्हाला काम करायचं आहे,’ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांना केलं आहे.
‘चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळणार असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. १ जूनपासून पावसाळा सुरु होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचं आव्हान असणार आहे,’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …पण मी कांगावाखोरांना उत्तर देत नाही; फडणवीसांच पटोलेंना प्रत्युत्तर
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- ‘मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला’, पंकजा मुंडेंच्या भावना
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू ; मायकल वॉनची अशी घेतली शाळा


