मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. मात्र स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटु कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढे सरसावत वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावत आहे.
भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने कोरोनाच्या या लढ्यात पुढे येत अन्नदात्याची भूमिका निभावली आहे. गेल्या महिन्याभरापासुन विरेंद्र सेहवाग फाऊंडेशन तर्फे तब्बल ५१ हजारापेंक्षा अधिक कोरोना पिडीतांना आणि त्यांच्या कुटूंबीयाना घरपोच अन्न पोहोचवले आहे. ही माहिती विरेंद्र सेहवाग फाऊंडेशनने स्वत: ट्विट करुन दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘दिल्लीमध्ये ५१ हजारपेक्षा अधिक कोविड रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण पुरवण्यात आले. दिल्ली एनसीआर परिसरातील कोणालाही कोरोनाची लागण झाली तर त्यांना जेवण हवे असल्यास आम्हाला संपर्क करू शकता.’ असे लिहीले आहे.
Privileged to have offered over 51000 free home cooked meals so far to covid patients in the last month in Delhi NCR. If you have a family in Delhi which is affected by Covid and need home cooked food made with love, please do DM. https://t.co/fa0amFAwwG pic.twitter.com/6Qc4ZktUFY
— Virender Sehwag Foundation (@SehwagFoundatn) May 15, 2021
हे ट्विट सेहवागने स्वत: रिट्विट केले आहे. या कार्याद्वारे अनेकांना प्रेरणा मिळते. भारतात सुरु असलेल्या या कोरोनाविरुद्ध लढाईत पॅट कमिन्स, ब्रेट ली यासारख्या विदेशी खेळाडूंनी मदत केली आहे. तर शिखर धवन, सचिन तेंडुलकर, रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी आर्थिक मदत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना : आता लढाई आणखी कठीण होणार, सज्ज रहा – मुख्यमंत्री ठाकरे
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- आयपीएल स्थगितीनंतर गर्लफ्रेंडसोबत गोव्यात वेळ घालवतोय ‘हा’ स्टार क्रिकेटपटू
- खाम, सुखना नदीपात्रात पुराचा धोका दर्शवण्यासाठी मनपा करणार ब्लू व रेड लाइन मार्किंग!
- बागबान चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचा पत्नीसह अपघात

