Share

सरकार पाडणारी शक्ती तयार करूया; अण्णा हजारे यांचा रोख नेमका कोणाकडे?

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरीही खऱ्या अर्थाने लोकशाही राज्य प्रस्थापित झाले नाही. आपल्या देशातील पक्ष आणि पार्टी पद्धतीमुळे राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. कोणतेही सरकार फक्त आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते.

आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकविणारी शक्ती उभी करा, असे आवाहन त्यांनी यातून केले आहे.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा आणि शहरात वॉर्डसभा अशी रचना करणारा कायदा करा, अशी आमची मागणी आहे. मात्र, पक्ष आणि पार्टीवर चालणाऱ्या आपल्या सरकारला लोकांना अधिकार देणारी अशी रचना नको आहे. त्यामुळे आतापर्यंत यासंबंधी कोणतीच सरकारने हालचाल केली नाही.

ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्धतीने आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतरही अशी आंदोलने करून अनेक कायदे मंजूर करून घेण्यात यश आलेले आहे. आता आपल्याला खऱ्या लोकशाहीसाठी लढा द्यायचा आहे. त्यासाठी सरकारला पडण्याची भीती वाटू शकेल, अशी शक्ती उभी करण्याची गरज आहे.

सरकारी तिजोरी ही जनतेची आहे. त्यातील व्यवहार पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजेत. गावातील सार्वजनिक संपत्तीचे गाव मालक आहे. ग्रामसभेच्या निर्णयाशिवाय त्यासंबंधी निर्णय होता कामा नयेत. जनता मालक आहे आणि सरकारमधील लोक सेवक आहेत.

सरकार बदलण्याची चावी मतदारांच्या हातात असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा ऐकत नसेल तर मतदारांनी अशा पक्ष व पार्टीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. हे मोठे हत्यार मतदार विसरले आहेत. त्यांना याची पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे, असे हजारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!