Share

‘सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याच वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

ठाकरे म्हणाले, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झालेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला.

दरम्यान, त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी, ‘मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?’ असा सवाल केला असता उद्धव ठाकरे यांनी, ‘मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली.’

‘सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय… राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही.’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!