Share

‘सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले. परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होत.

दानवे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला मुलाखत दिली. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. विरोधक सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा कडक समाचार देखील घेतला.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!