Share

IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: के एल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या ७व्या लीग सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने त्यांना २११ धावांचे लक्ष्य दिले होते. पण लखनऊच्या फलंदाजांनी हे मोठे लक्ष्य ६ गडी राखून पूर्ण केले.

सामना जिंकला असला तरी सुपर जायंट्सची (LSG) गोलंदाजी खास झाली नाही. रवी बिश्नोई (Ravi bishnoi) वगळता, सर्व गोलंदाजांनी प्रति षटक सुमारे १० धावांच्या इकॉनॉमी रेटने धावा लुटवल्या. पण रवीने ४ षटकात केवळ २४ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय आवेश खानलाही २ बळी मिळाले पण त्याने ४ षटकात ३८ धावा दिल्या. त्याचबरोबर गेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या चमीराने (dushmantha chameera) या सामन्यात ४९ धावा दिल्या. त्यामुळे केवळ बिश्नोईंची गोलंदाजी किफायतशीर ठरली.

के एल राहुलने (KL rahul) रवी बिश्नोई कौतुक करत सांगितले, ‘ त्याचे हृदय मोठे आहे आणि तो एखाद्या फायटरप्रमाणे खेळतो. ओल्या बॉलवरही इतकी शानदार गोलंदाजी करणे त्याचे पात्र दाखवते. रवीला नेहमीच पुढे जायचे आणि शिकायचे असते. तो फिरकी प्रशिक्षकासोबत वेळ घालवतो. याचे श्रेय विजय दहिया आणि गौतम गंभीर यांना द्यायला हवे. त्यांनाच तो हवा होता.’

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!